Pune : सिंहगड रोडवरील उड्डाणपूलास नरवीर तानाजी मालुसरे नाव द्यावे
Updated On:

पुणे : महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर राजाराम पुल ते फन टाईम सिनेमागृह दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डानपुलास नरवीर तानाजी मालुसरे उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेना खडकवासला विधानसभा प्रमुख महेश पोकळे यांनी केली आहे.
सिंहगडाची लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटनांपैकी एक घटना आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात छत्रपती शिवाजी महराजांनी मोहीमा आखल्या होत्या त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतीशय महत्वाचे होते.
सिंहगडावर झालेली ही लढाई नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानासाठी ओळखली जाते.नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास पुढील पिढीला माहिती व्हावे यासठी हे नाव देण्यात यावे असे पत्र पोकळे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.





