Pune : धानोरीत ‘अर्धी पावनखिंड मीनी मॅरेथॉन’ उत्साहात संपन्न

विश्रांतवाडी: धानोरीतील गंगा न्यु टाऊन प्रतिष्ठान व डीएन परांडे स्पोर्ट्स हब यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त “अर्धी पावनखिंड मीनी मॅरेथॉन” आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा व पावनखिंडीची महती उपस्थित सर्वांना सांगितली. तसेच पर्यावरण संवर्धन व व्यायामाचे महत्त्व याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने मॅरेथॉनचे आयोजन केले होते.
गंगा न्यू टाऊन सोसायटी येथे भगवा झेंडा फडकवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. तर डीएन परांडे स्पोर्ट्स हब अकॅडमीच्या मैदानावर मॅरेथॉनची सांगता झाली.या मॅरेथॉनमध्ये डीएन परांडे पार्क परिसरातील एक हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. या मॅरेथॉनमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकविलेल्या स्पर्धकांना डॉ. श्रीकुमार बुरसे, डॉ. खामकर, सागर गांधी, विजय परांडे, अतुल परांडे यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली.
सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह दिले. विशाल टिंगरे यांनी सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती. त्याचबरोबर अम्ब्युलन्स देखील उपलब्ध करून दिली होती. स्पर्श हॉस्पिटल यांनी प्रथमोपचाराची सेवा दिली.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेली मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी राहुल झा, दिनेश सातकर, मयुर परांडे, प्रवीण पाठक, अनिल नरके, दीपक चौहान, स्वप्नील टेहरे, वैभव कदम, वृषाली पाटील, गंगा न्यू टाऊन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सभासद यांनी मेहनत घेतली. डीएन परांडे स्पोर्ट्स हब,किंग्स क्रिकेट क्लब, अल्फा बॅडमिंटन अकॅडमी, स्ट्रायकर फुटबॉल क्लब, स्पॉट इलेव्हन रेस्टॉरंट यांचे विशेष सहकार्य लाभले





