पुणे – एसव्हीएस कंपनीच्या मालकाला अटक
Updated On:

पुणे -आगीत 17 कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पौड पोलिसांकडून एसव्हीएस कंपनीचे मालक निकुंज शहा यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. निकुंज शहा यांच्यासह त्यांची दोन मुलेही कंपनीमध्ये भागीदार आहेत. यातील एक मुलगा दुबईत तर एक पुण्यात असतो.





