Pune: कॅन्टोन्मेंट व्यापारी संघटनांचा पाठिंबा; सुनील कांबळे यांच्या पदयात्रांना जोरदार प्रतिसाद

पुणे – पुणे कॅन्टोन्मेंट व्यापारी संघटना व कॅन्टोन्मेंट विभागातील सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने वतीने भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
कांबळे यांच्या प्रचारार्थ कॅम्प परिसरातील भोपळा चौक येथील राजस्थानी भवन या ठिकाणी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी संघटनांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हा पाठिंबा देण्यात आला.
शिवसेनेचे शहर नेते अजय भोसले, नगरसेवक उमेश गायकवाड, दिलीप गिरमकर, उमेश शहा, राज राणावत, राजेश श्रीगिरी, राज जैन, नरेश जाधव, संतोष यादव, यश वालिया, अचल जैन, शिवाजीराव मानकर, विमल मेहता, मनीष सोनिग्रा, अर्जुनराव खुरपे, सुनील सोळंकी, विपेश सोनिग्रा, वसंत मेहता यांच्यासह व्यापारी बंधू आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी व्यापारी बांधवांचे प्रश्न आणि समस्या राज्य शासन, तसेच केंद्र शासनासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार दिलीप कांबळे यांनी सांगितले.
फटाक्यांची आतिषबाजी…
आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक २० मध्ये पदयात्रा काढण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी विविध चौकांत फटाक्यांच्या आतिषबाजी आणि फुलांचा वर्षात करून कार्यकर्त्यांनी पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले.
भाजपा कॅन्टोन्मेंट सरचिटणीस मुनावर भाई खान यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून भव्य पदयात्रेची सुरुवात झाली राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, मुनीरभाई सय्यद, नेते राहुल तांबे, शांतिलाल मिसाळ, प्रसाद चौघुले, दत्ता जाधव, रिपाइंचे नेते संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, नेते महेंद्र कांबळे, संदीप धांडोरे, भाजपाचे सुधीर जानजोत, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष संदीप लडकत, उपाध्यक्ष तुषार पाटील, कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष विवेक यादव पदयात्रेत सहभागी झाले होते.





