पुणे :यूपीएससी परीक्षेत “सारथी’चे घवघवीत यश

प्रशिक्षण शिबिरातील 21 उमेदवारांची निवड
पुणे – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जाहीर केलेल्या निकालात “सारथी’च्या प्रशिक्षण उपक्रमातील 21 उमेदवारांनी यश संपादन केले आहे. विनायक नरवाडे याचा गुणवत्ता यादीत 37 वा क्रमांक आहे. यशस्वितांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात “सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी ही माहिती दिली. सारथीने मराठा, कुणबी या विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत नि:शुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती.
मुलाखातीच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण नियोजित करून, तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले व सारथी संस्थेत अभिरूप मुलाखतीचे नियोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले होते. या सर्व उमेदवारांचे सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
“सारथी’चे यशस्वी उमेदवार
विनायक नरवाडे, गौरव साळुंखे, प्रतीक धुमाळ, प्रथमेश राजशिर्के, आनंद पाटील, सागर मिसाळ, सुरज गुंजाळ, अनिल मस्के, अर्पिता ठुबे, अमोल मुरकुट, अनिकेत फडतरे, राकेश अकोलकर, ओंकार पवार, नितीन पुके, प्रणव ठाकरे, रणजीत यादव, माधुरी गरूड, पूजा कदम, हर्षल घोगरे, रविराज वडक व सायली गायकवाड या उमेदवारांनी सारथीमार्फत यूपीएससीचे प्रशिक्षण घेऊन यश मिळल्याचे काकडे यांनी सांगितले.




