Pune : सिंहगड किल्ला दोन जूनपर्यंत पर्यटकांसाठी बंद
Updated On:

पुणे : सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असल्याने दोन जूनपर्यंत किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आल्याचे, वनविभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
गडावर जेसीबी किंवा अन्य मोठ्या वाहनांचा वापर शक्य नसल्यामुळे काही स्थायिक आरसीसी (रेनफोर्स्ड सिमेंट काँक्रीट) बांधकामे पूर्णपणे हटवणे बाकी आहे.
ही सर्व कामे कामगारांमार्फत करावी लागत असल्यामुळे कार्यवाहीसाठी अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे, असे वनविभागाने कळवले आहे.
त्यामुळे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून ही कार्यवाही लवकरच पूर्णत्वास नेण्यात येईल आणि त्यात निश्चितच यश येईल, असा विश्वास खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.





