Pune : उद्या सिंहगड पर्यटनासाठी बंद
Updated On:

पुणे : आपत्ती निवारणाच्या गुरुवारी (दि. २९ मे) होणाऱ्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने या दिवशी सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याविषयी पुणे वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी आदेश काढला आहे.
सध्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदरील अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याबाबत हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांसाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही यादिवशी बंदी घालण्यात आली असून, कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आल्याचे वनविभागाने कळवले आहे.





