Pune : गोळीबार मैदान चौकात सिग्नल बंद
Updated On:

वानवडी –गोळीबार मैदान चौकातील सिग्नल यंत्रणेचे तीन-तेरा वाजले आहेत. चौकापासून सोलापूर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
गोळीबार मैदान चौकातून कोंढव्याकडे वळण्यास तसेच पुलगेटकडे सरळ जाण्यास बंदी आहे. परंतु, चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्यास वाहन चालक या चौकातून बंदी असलेल्या रस्त्यावरूनच अडवी-तिडवी वाहने चालवत असल्याने चौकात वाहतूक कोंडी होत आहे. यातून मार्ग काढताना पादचारी, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या भागात अनेक मराठी व इंग्रजी शाळा असल्याने शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर विद्यार्थ्यांची गर्दी होते. स्कूल बसकडे जाताना किरकोळ अपघात घडत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.





