Pune : बिबवेवाडीत ‘श्रावण क्वीन 2025’ उत्सव उत्साहात

पुणे – सत्यप्रभा स्टुडिओ आणि लोटस लँडमार्क प्रस्तुत ‘कलादालन’च्या वतीने बिबवेवाडी झोनसाठी ‘श्रावण क्वीन 2025’ हा सौंदर्य, कला आणि परंपरेचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात श्रीरंग सोसायटीने विजेतेपद पटकावले. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागींची उपस्थिती लाभली.
‘कलादालन’ हे नुसते एक इव्हेंट नसून, लोटस परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला यांसारख्या विविध कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याचे एक सृजनशील व्यासपीठ आहे. “श्रावण क्वीन 2025” ही स्पर्धा नसून एक पारंपरिक उत्सव असून, कौटुंबिक एकत्रीकरण आणि ओळखी वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम साजरा करण्यात आला, असे स्मिता गिरी (सह-संचालक, लोटस व सत्यप्रभा स्टुडिओ) यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महुआ नारायण पंढरपूर (Founder & MD, Hospitality Law Expert; Joint Secretary, Ambrosia Institute of Hotel Management) होत्या. परीक्षक म्हणून शुभांगी राजकुमार सोमवंशी (मालक, Reflection Cosmetics) आणि निष्ठिगंधा कापरे (डान्स कोरिओग्राफर) यांनी भूमिका पार पाडली.
कार्यक्रमास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, पुढील महिन्यात कोथरूड झोनसाठी देखील ‘श्रावण क्वीन 2025’ उत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती गिरी यांनी दिली.





