Pune : वडगाव शेरीमध्ये बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन

Updated On:

येरवडा (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे निम्मे आमदार सोबत घेत बंडखोरी केली आहे. यामुळे आता बंडखोरांविरोधात शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने रविवारी बंडखोर आमदार एकनाथ शिंदेच्या विरोधात स्व. बिंदुमाधव ठाकरे चौकात तीव्र निदर्शने करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक महिला आघाडी, युवासेना उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं, अशी मागणी बंडखोर आमदारांनी केली आहे. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट