Pune Crime News : पुण्यात भरदिवसा रक्ताचा सडा! गाडी अडवून तरुणाची निर्घृण हत्या, पैशांच्या वादातून गोळीबार
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या थराराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसरात सोमवारी सायंकाळी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवल्यानंतर झालेल्या हल्ल्यात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल काळे (वय 31, बाबुराव नगर, शिरूर) याचा गोळीबारात जागीच मृत्यू झाला. तर केदार झाडगे (रा. कुंभार आळी, शिरूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)
गाडीला धडक देऊन हल्ला
सायंकाळी सुमारे 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान विशाल काळे आणि केदार झाडगे हे वाहनातून प्रवास करत असताना आरोपींनी त्यांच्या गाडीला धडक देत त्यांना अडवले. त्यानंतर सनी यादव आणि त्याच्या 5 ते 6 साथीदारांनी अचानक हल्ला चढवत गोळीबार केल्याचा आरोप आहे. (Pune Crime News)
या हल्ल्यात विशाल काळे याला गोळ्या लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर केदार झाडगे गंभीर जखमी झाला. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. (Pune Crime News)
पैशांच्या व्यवहारातून वादाची शक्यता
प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या आर्थिक व्यवहारातील वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मयत आणि आरोपी यांच्याविरोधात यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. (Pune Crime News)
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. करडे घाट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. (Pune Crime News)
घटनास्थळावरून पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. (Pune Crime News)
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भरदिवसा रस्त्यावर वाहन अडवून गोळीबार करण्याची धाडसी घटना घडल्याने शिरूर तालुक्यात गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असून, हत्येमागील नेमके कारण आणि कटातील इतर आरोपींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. (Pune Crime News)





