Pune Schools Holiday : पुण्यातील १०१ शाळांना आठवडाभर सुट्टी; महापालिकेचा मोठा निर्णय
Pune Schools Holiday : पूरसदृश परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Pune Schools Holiday : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देहू आणि आळंदी परिसरातील पूरसदृश परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये पुढील सोमवारपासून नियमित अध्यापन सुरू होणार आहे. (Pune Schools Holiday)
महापालिकेच्या निर्णयानुसार, उद्यापासून रविवारपर्यंत या १०१ शाळांमध्ये वर्ग भरविण्यात येणार नाहीत. या कालावधीत शाळांची इमारत वारकऱ्यांच्या तात्पुरत्या निवासासाठी वापरण्यात येणार आहे. (Pune Schools Holiday)
देहू आणि आळंदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (Pune Schools Holiday)
‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात लाखो वारकरी पुण्यात दाखल होत असताना त्यांना सुरक्षित निवास, आवश्यक सुविधा आणि विश्रांती मिळावी, यासाठी पुणे महापालिकेने शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. (Pune Schools Holiday)
महापालिकेने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना दिल्या असून, पालक आणि विद्यार्थ्यांनी सुट्टीबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Pune Schools Holiday)
मोठी बातमी..! ‘या’ 3 जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश






