Ozar News : जुन्नर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या अंतर जिल्हा टोळीचा पर्दाफाश; नाशिकमधून चौघांना अटक, ३८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
Ozar News : दहशत माजविणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि ओतूर पोलिसांच्या पथकाला मोठे यश आले आहे.

Ozar News : घरफोड्या करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या धडाकेबाज कारवाईत चार चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, रोख २ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा तब्बल ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्यमान हस्तगत करण्यात आला आहे. (Ozar News)
वसीम मुनीर पठाण, वय २९ वर्षे, रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, नाशिक,अदनान युनूस पठाण, वय २६ वर्षे, सध्या रा. वडाळा, इंदिरानगर, नाशिक, मूळ रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, नाशिक,सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख, वय ४० वर्षे, रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, नाशिक असे पोलिसांनी ताब्यात घेतलेला इसमांची नावे आहेत. (Ozar News)
ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढला. ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समांतर तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Ozar News)
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासादरम्यान पोलिसांना संशयित कार आढळून आली. संबंधित कारच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी नाशिक परिसरात तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर आरोपींना वडाळा, लासलगाव, नाशिक येथून ताब्यात घेतले. (Ozar News)
अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपींनी गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे ओतूर पोलीस स्टेशन मधील ३ गुन्हे आणि नारायणगाव पोलिस स्टेशन मधील १ अशा एकूण ४ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Ozar News)
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस अंमलदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, भारत मोहोळ, चेतन पाटील तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, विशाल गोडसे, धनंजय पालवे यांनी केली आहे. पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव हे करत आहेत. (Ozar News)
Ozar News : न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाची सहल अहमदाबाद येथील इस्त्रो सेंटरला




