पुणे ग्रामीण : जवळार्जुनमधे अवतरणार विकासाची गंगा – कणसे

सासवड -पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथील नागरिकांना सुख-सुविधा मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली जातील व नागरिकांना त्याचा लाभ दिला जाईल. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना गती देऊन गाव आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच सोमनाथ कणसे यांनी सांगितले.
जवळार्जुन येथे 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या अंदाजे 1 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी सरपंच सोमनाथ कणसे बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन टेकवडे, सदस्या संगीता टेकवडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुजित राणे, हनुमंत टेकवडे, नागेश टेकवडे, प्रकाश राणे, मोहन राणे, गणेश राणे, महेश टेकवडे, विष्णू टेकवडे, प्रशांत राणे, कल्याण साळुंखे, सुभाष जगताप, प्रदीप खोमणे, मामासाहेब गुळूमकर, आप्पासो राणे, उपस्थित होते.
यावेळी (कंसात कामाचे नाव व रक्कम) : चोखाडी अंतर्गत गटर लाइन करणे (8,04,794), गावठाण अंतर्गत रस्ता करणे (5 लक्ष), गावठाण अंतर्गत रस्ता क्रॉंक्रिटीकरण करणे (4,49,411) राणेवस्ती अंतर्गत रस्ता करणे (3 लाख), चोरवाडी शाळा दुरुस्ती करणे (3 लाख 50 हजार), गावठाण स्मशानभूमी सुधारणा करणे (3 लाख) या कामाचे भूमिपूजन सरपंच सोमनाथ कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीतील तरुणांकडून करण्यात आले.





