पुणे : शहरातील पाणीकपातीच्या निर्णयात बदल, ‘या’ तीन दिवशी होणार नियमित पाणी पुरवठा
Updated On:

पुणे : महापालिकेकडून शहरात 4 ते 11 जुलै पर्यंत दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यात बदल करत आता 8 ते 11 जुलै पर्यंत दररोज पाणी पुरवठा केला जाणार आहे.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद मुळे शहरात पूर्णवेळ पाणी द्यायचे असल्याने ही कपात तीन दिवस रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, त्यानंतर पुन्हा धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन 11 जुलै रोजी पुढील निर्णय घेतला जाणार आहे.






