Pune Rain Update: पुण्याला रेड अलर्ट जारी ! नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

Pune News – सध्या पुणे जिल्हा आणि शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात दिनांक 24 व 25 ऑगस्ट 2024 रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात घाट माथा व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले असुन त्यात वाढ होण्याची श्यक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तसेच, खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे खडकवासला धरणातून दुपारी ४ वा. मुठा नदी पात्रात १९ हजार ११८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये आणि खबरदारी घ्यावी असं सांगितलं आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. अशी माहिती देण्यात आली आहे.





