पुणे: दर्शना पवार खून प्रकरणात राहुल हांडोरेची येरवडा कारागृहात रवानगी
Updated On:

पुणे – लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने एमपीएससी परीक्षा पास झालेल्या दर्शना पवारचा खून केल्याप्रकरणात अटकेत असलेला राहुल हांडोरे याची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते.
18 जून रोजी दर्शना पवार हिचा राजगडच्या पायथ्याशी मृतदेह सापडला होता. त्यानंतर मित्र हांडोरे यानेच हा खून केल्याचे निष्पन्न आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सुरूवातीला पोलीस कोठडी, आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपीच्या वतीने ऍड. गणेश माने यांनी काम पाहिले.





