pune : उपप्राचार्य डॉ. सुवर्णा देवळाणकर यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान
pune :

pune : सेंट मीरा महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुवर्णा हितेंद्र देवळाणकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या कुलपती डॉ. आबेदा इनामदार आणि कुलगुरू डॉ. सुनील कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यांसाठी डॉ. देवळाणकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल सेंट मीरा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीरू भगत तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





