Pune : गणेशखिंड रस्त्यावर ‘या’ वेळेत वाहतूक कोंडीची शक्यता; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, एका राजकीय पक्षाच्या मोर्चामुळे आज दुपारी म्हसोबा गेट, शिवाजीनगर ते काकडे मॉल, चतु:शृंगी या मार्गावरील गणेशखिंड रस्ता काही काळासाठी वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार आहे. पुणे शहर वाहतूक शाखेने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चा गणेशखिंड रस्त्याने जाणार असल्याने दुपारी १२ ते ३ या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पर्यायी मार्गांची माहिती
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारे वाहनचालक :
ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून खडकी मार्गे शिवाजीनगरकडे जावे.
बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणारे वाहनचालक :
पुणे विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून नवीन पुलावरून शिवाजीनगरकडे जावे.
तसेच विद्यापीठ चौकातून ब्रेमेन चौकात जाऊन उजवीकडे वळून खडकी मार्गे प्रवास करावा.
रेंज हिल्सकडून शिवाजीनगरकडे जाणारे वाहनचालक :
सिंपनी सर्कल येथे U-टर्न घेऊन खडकी अंडरपास मार्गे शिवाजीनगरकडे जावे.
शिवाजीनगरकडून विद्यापीठ चौकाकडे येणारे नागरिक :
मॉडेल कॉलनी मार्गे किंवा थोरात चौक – दीप बंगला चौक – एस.बी. रोड मार्गे विद्यापीठ चौकात यावे.
वाहतूक विभागाचे आवाहन
- नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो मोर्चाच्या मार्गावरून प्रवास टाळावा.
- वाहतुकीस सहकार्य करून अनावश्यक कोंडी टाळावी, असे आवाहन पोलिस उप आयुक्त (वाहतूक शाखा), पुणे शहर यांनी केले आहे.





