पुणे: पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्त नमुने अदलाबदलीच्या आरोपावरून ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हाळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन चालकाला मदत करण्यासाठी दोन्ही डॉक्टरांनी त्याच्या आईचे रक्त नमुने तपासणीसाठी वापरल्याचे उघड झाले होते. गुन्हे शाखेने कारवाई करत दोन्ही डॉक्टर आणि एका शिपायाला अटक केली होती. गेल्या दहा महिन्यांपासून हे दोन्ही डॉक्टर तुरुंगात आहेत. पोलिसांवरही कारवाईचा प्रस्ताव या प्रकरणात संशयास्पद भूमिका आढळलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीसाठी पुणे पोलिसांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या घडामोडींमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.