Pune : विद्यापीठात अश्लील कृत्य करणाऱ्याला पोलीस कोठडी
Updated On:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करणाऱ्या अनिश वसंत गायकवाड (वय २४, रा. कवडेनगर, पिंपळे गुरव) या तरुणाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
त्याच्याविरोधात विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार चतुःश्रृंगी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मंगळवारी (दि.२५) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. त्यावेळी विद्यापीठात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी जेवण करण्यासाठी जात असताना आरोपी गायकवाडने अश्लील कृत्य करत त्यांचा विनयभंग केला, असे तक्रारीत नमूद केले आहे.
सरकारी वकील विशाल मुरळीकर व तपास अधिकारी नरेंद्र पाटील यांनी त्याच्या कोठडीची मागणी केली.





