Pune News : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी; २ ऑक्टोबरपासून पुण्यात एस. एम. जोशी पुलावर उपोषण
Pune News : आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर पुणे पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली आहे.

Pune News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीपासून आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यापर्यंतच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. एस. एम. जोशी पुलावर २ ऑक्टोबरपासून हे आंदोलन करण्यात येणार आहे. (Pune News)
आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पुणे पोलिस आयुक्तांकडे २७ सप्टेंबरपासून आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी एस. एम. जोशी पुलाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालय अथवा पुणे रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा पर्याय सुचविला होता. (Pune News)
मात्र, एस. एम. जोशी पुलावरच आंदोलन करण्यावर रोहित पवार ठाम होते. परवानगी न मिळाल्यासही आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून आंदोलनाच्या ठिकाणाबाबत चर्चा करण्यात आली. अखेर एस. एम. जोशी पुलावर २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. (Pune News)
एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीतील बदल, विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसह आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येणार आहे. (Pune News)





