Pune : मित्राच्या खूनाच्या बदल्यासाठी सराफी पेढी लूटण्याचा डाव..

पुणे – ऐन दिवाळीत सराफी पेढी लुटण्याचा चोरट्यांचा डाव भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapith Police) उधळून लावला आहे. याप्रकरणी चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसेस तीन दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune crime news)
राधेमोहन उर्फ मुन्ना सीताराम पिसे (19 , रा. वारजे माळवाडी), समीर ज्ञानेश्वर मारणे (20 , रा. नऱ्हे)स अर्जुन मोहन बेलदरे (20 , रा. आंबेगाव, कात्रज), तुषार दिलीप माने (19 ), यश मनोज लोहकरे (19 ), अनिल दिलीप माने (20 ), ओंकार उर्फ मयुर दादासाहेब माने (20 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. या भागातील सराफी पेढीवर दरोडा घालण्यासाठी चोरट्यांची टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी पिसे, मारणे, बेलदरे, माने, लोहकरे, माने, यांना पकडले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, पाच काडतुसे, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मंगेश पवार, अभिजीत जाधव, राहुल तांबे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश जमदाडे, शैलेंद्र साठे, महेश बारवकर, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे, मितेश चोरमोले आदींनी ही कामगिरी केली.
मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी-
आरोपी सराइत आहेत. त्यांच्या मित्राचा सिंहगड परिसरात खून झाला होता. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पैशांची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यासाठी भारती विद्यापीठ परिसरातील सराफी पेढी लुटण्याचा कट रचला. हे पैसे पुढे जामिन व इतर न्यायालयाच्या खर्चासाठी तरतुद म्हणून ते वापरणार होते.





