पुणे : केआरए ज्वेलर्सच्या वतीने ग्रँड ज्वेलरी फेस्टिव्हलचे आयोजन

सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिने व वस्तूंच्या घडणावळीवर घसघशीत सूट
पुणे : दीपावलीचे औचित्य साधत १९३७ सालापासून पुणेकर ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या सुप्रसिद्ध कृष्णा राजाराम अष्टेकर अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने यावर्षी ‘ग्रँड ज्वेलरी फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केआरए ज्वेलर्सचे संचालक अतुल अष्टेकर यांनी दिली आहे.
नागरिकांचा सोने खरेदीकडे वाढत असलेला कल पाहता सोन्याच्या दागिन्यांचे विविध पर्याय आणि अनेकविध डिझाइन्स यांसोबतच फेस्टिव्हल अंतर्गत हिरे, सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर ही सूट असेल अशी माहितीही त्यांनी कळविली आहे. सदर फेस्टिव्हल अंतर्गत असलेल्या योजनांचा लाभ ग्राहकांना ३ नोव्हेंबर पर्यंत घेता येणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना अतुल अष्टेकर म्हणाले, “दीपावलीच्या उत्साही क्षणांचा शुभारंभ करताना सोने खरेदी ही प्रत्येक ग्राहकासाठी महत्त्वपूर्ण असतेच. ग्राहकांची ही सोने खरेदी आणखी आनंदी व्हावी यासाठी केआरए ज्वेलर्सच्या वतीने ग्रँड ज्वेलरी फेस्टिव्हलचे आयोजन आम्ही केले आहे.
याअंतर्गत हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% सूट, प्रती १० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर रु. २ हजार पर्यंतची सूट आणि चांदीचे दागिने व वस्तूंच्या घडणावळीवर १०% सूट यांचा समावेश आहे.”
यासोबतच अन्य कोणत्याही ज्वेलर्सकडून घेतलेले आपले जुने हॉलमार्क दागिन्यांचे १००% एक्स्चेंज मूल्य ग्राहकांना आमच्या येथे मिळेल, अशी माहितीही अतुल अष्टेकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, “सणासुदीच्या दिवसांसोबतच आगामी लग्नसराईनिमित्त ग्राहकांची आवड लक्षात घेत केआरए ज्वेलर्सच्या वतीने नवीन अँटिक कलेक्शनवर देखील भर देण्यात आला असून सोन्या मारुती चौकातील दुकानामध्ये ग्राहकांना हे कलेक्शन पाहता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न व समारंभात घालता येतील असे मोती, कुंदन, बीड्स लावून बनविलेले ब्रायडल सेट्स, नेकलेसेस यांचा समावेश आहे.”
सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यात वाढत असले तरी ग्राहकांचे बजेट त्या तुलनेत वाढत नसल्याने ही महत्त्वाची बाब लक्षात घेत केआरए ज्वेलर्सच्या वतीने यावर्षी लाईट वेट ज्वेलरी अर्थात वजनाने हलक्या दागिन्यांमध्ये अनेकविध पर्याय व डिझाइन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असे सांगत अष्टेकर म्हणाले, “केआरए ज्वेलर्सच्या वतीने यावर्षी सादर करण्यात आलेले न्यासा (एनवायएएसए) कलेक्शन मध्ये अगदी १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांच्या आतमधील दागिन्यांचा समावेश आम्ही केला आहे. या कलेक्शन मधील दागिने हे दीड ग्रॅम वजनापासून सुरु होत असून यामध्ये रोज वापरता येतील अशा अंगठ्या, चेन, पेंडेंट सेट, लहान मंगळसूत्र, कलर स्टोन्स, अमेरिकन डायमंडमधील दागिने, कानातले, ब्रेसलेट्स यांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच मोठी मंगळसूत्रे, नेकलेस, बांगड्या यांमध्ये देखील कमी वजनाच्या डिझाइन्स मधील प्रकार केआरए ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहेत असेही अष्टेकर यांनी नमूद केले.
ग्राहकांना या ज्वेलरी फेस्टिव्हलचा लाभ केआरए ज्वेलर्सच्या सोन्या मारुती चौक, कोथरूड, सातारा रस्ता, औंध, नगर रस्ता, हडपसर, चिंचवड, बारामती, सातारा येथील सर्व सोई सुविधांनी सुसज्ज अशा दालनांमध्ये घेता येणार आहे.





