PUNE: भवानी पेठ, स्वारगेट, शंकर शेठ रस्ता परिसरात एकवेळ पाणी

पुणे – महापालिकेकडून पर्वती येथील एमएलआर टाकी ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी दि. ८ जानेवारी ते २२ जानेवारी कालावधीत भवानी पेठ, स्वारगेट परिसर, शंकर शेठ रस्ता या परिसरात दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे.
दरम्यान, या कामासाठी या भागासाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था ८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून करण्यात आली असून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
या भागात एक वेळ पाणी : प्र. क्र. १८ – स्वारगेट पोलीस लाईन, झगडेवाडी खडकमाळ आळी, घोरपडी पेठचा संपूर्ण परिसर, मोमिनपुरा पूर्ण, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत, इत्यादी भाग. प्र. क्र. १९ – लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रोड, पूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भाग. प्र.क्र. २० – भगवान दास चाळ.
वायमेकर चाळ न्यू नानापेठ परिसर, राजेवाडी, पत्राचाळ एसआरए, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी. प्र. क्र. २८ – मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रोड एस.टी. स्टॅन्ड ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी. प्र. क्र. २९ – लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी.





