पुणे : महापालिका हद्दीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक बाधित
Updated On:

पुणे-राज्यात ओमायक्रॉनचे सोमवारी नवे 31 बाधित आढळले आहेत. यामध्ये पुणे शहरातील बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे शहरातील बाधितांची संख्या 28 आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 1 हजार 247 झाली आहे.
याशिवाय पुणे ग्रामीण मधील दोन आणि पिंपरी चिंचवड मध्ये एका बाधिताचा समावेश आहे. एकूणच सोमवारी जे बाधित सापडले आहेत ते सगळेच्या सगळे पुणे जिह्यातील आहेत.
हे सगळे रुग्ण “राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळे’ने रिपोर्ट केले आहेत. शहरातील बाधित संख्या 251 झाली आहे तर पिंपरी चिंचवडची 69 झाली आहे. पुणे ग्रामीणमध्ये 34 जण बाधित सापडले आहेत. आतापर्यंतच्या एकूण बाधितांमधील 467 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 4 हजार 039 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 89 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.





