Pune: ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली अश्लील व्हिडिओ चित्रीकरण; पुण्यात पत्रकार रोहन कदमवर गुन्हा दाखल

Pune: पुणे श्रमिक पत्रकार संघाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, कोणालाही पाठीशी घालू नये, अशा कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.

Updated On:
Pune: ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली अश्लील व्हिडिओ चित्रीकरण; पुण्यात पत्रकार रोहन कदमवर गुन्हा दाखल

Pune: शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात एका महिलेचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या गंभीर प्रकरणी पत्रकार रोहन कदम याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित महिलेने याबाबत जबाब नोंदवला होता.

स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली संबंधित पत्रकार रोहन कदम याने महिलेचे परवानगीशिवाय अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत संबंधितावर गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, कोणालाही पाठीशी घालू नये, अशा कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Aditi Tatkare : अंगणवाडीच्या आहार गुणवत्तेशी तडजोड नाही; मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश

2026-08-25 17:07:40

Aditi Tatkare : अंगणवाडीच्या आहार गुणवत्तेशी तडजोड नाही; मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश

Rahul Gandhi: राहुल गांधींचे फडणवीसांना थेट पत्र; आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील अपमानास्पद नियम व प्रेग्नेंसी टेस्टचा मुद्दा

2026-08-25 09:24:21

Rahul Gandhi: राहुल गांधींचे फडणवीसांना थेट पत्र; आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील अपमानास्पद नियम व प्रेग्नेंसी टेस्टचा मुद्दा

pune : सायबर गुन्हा सिद्ध करण्याचे आव्हान!

2026-08-25 08:10:34

pune : सायबर गुन्हा सिद्ध करण्याचे आव्हान!

Pune Ganeshotsav: पुण्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव, डीजे दणाणणारच !

2026-08-25 07:51:01

Pune Ganeshotsav: पुण्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव, डीजे दणाणणारच !

Price of flowers: श्रावणात फुलांचा ‘भाव’ कोमेजला!

2026-08-25 07:46:57

Price of flowers: श्रावणात फुलांचा ‘भाव’ कोमेजला!