Pune : “जीबीएस’चे आणखी नऊ बाधित
Updated On:

पुणे : “ गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) बाधित संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आजही नव्याने नऊ जीबीएस बाधित आढळले आहेत. त्यामुळे “जीबीएस’ची रुग्णसंख्या १५८ वर पोहचली आहे.
एकूण रुग्णांपैकी ३१ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून ८३ रुग्ण हे समाविष्ट गावांतील आहेत. १८ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका तर १८ रुग्ण ग्रामीणमधील आहेत. ८ रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. दाखलपैकी २१ जण व्हेंटिलेटवर तर ४८ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत ३८ जण बरे झाले आहेत.
“जीबीएस’ची स्थिती
वय – एकूण रुग्णसंख्या
० ते ९ – २३
१० ते १९ – २२
२० ते २९ – ३५
३० ते ३९ – १८
४० ते ४९ – १६
५० ते ५९ – २५
६० ते ६९- १४
७० ते ७९ – २
८० ते ८९ – ३
Remarks :





