Pune News : प्रेमाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; चौघांवर गुन्हा दाखल
प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune News) उघडकीस आला आहे.

Pune News : प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune News) उघडकीस आला आहे. आरोपीने स्वतःसह आपल्या मित्र आणि लहान भावाकडूनही तरुणीवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ चित्रीत केल्याचा तसेच ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी (Pune News) विमानतळ पोलीस ठाण्यात फरहान रिझवान शेख, फजल शेख, रेहान रिझवान शेख आणि साहिल यांच्याविरुद्ध बलात्कार, धमकी व अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची २०२४ मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना फरहान रिझवान शेख (रा. मुंढवा) याच्याशी ओळख झाली. पुढे सोशल मीडियावरून दोघांमध्ये संवाद सुरू झाला. नोव्हेंबर २०२५ मध्ये फरहानने प्रेमाची कबुली देत तरुणीला वाघोली येथील एका पीजी रूमवर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर फरहानने वेगवेगळ्या बहाण्याने तरुणीला वारंवार बोलावून तिच्यावर अत्याचार केले. तसेच त्याचा मित्र फजल शेख, लहान भाऊ रेहान शेख आणि नंतर साहिल नावाच्या तरुणाकडूनही तिच्यावर लैंगिक अत्याचार करवून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या सर्व घटनांचे व्हिडिओ चित्रीत करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच डिसेंबर २०२५ मध्ये आजारी असल्याचे खोटे सांगून खराडी येथील सदनिकेवर बोलावून पुन्हा अत्याचार करण्यात आला.
त्यानंतर आरोपीकडून सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न होत असल्याने तरुणीने (Pune News) त्याच्याशी संबंध तोडले. मात्र जून २०२६ मध्ये पुन्हा माफी मागण्याच्या बहाण्याने तिला लॉजवर नेण्यात आले आणि तेथे साहिल नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.






