Pune News : सराईत वाहनचोरांना येरवडा पोलीसांनी केली अटक

येरवडा – सराईत वाहनचोरांना पकडुन त्यांच्याकडुन दोन दुचाकी आणि ६ मोबाईल असा जवळपास २ लाख २१ हजाराचा मुद्देमाल येरवडा पोलीसांनी हस्तगत केला. येरवडा पोलीसांनी याप्रकरणी यश सागर ओंबाळे (वय २३, रा. कंजारभाट, येरवडा), ओमकार राजेश मोरे (वय २१, रा. रामनगर, येरवडा) या दोघांना अटक केली आहे.
येरवडा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अंमलदार सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांच्या बातमीदारांकडून दोन संशयित दुचाकी वाहनाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलीसांनी सापळा रचुन दोघांना पकडुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या दोघानी चतु:श्रुंगी आणि शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी दोन्ही मोपेड व ६ मोबाईल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
परीमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके , गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके ,हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी ही कामगिरी केली आहे.





