Pune News : सात पंचायत समित्यांवर महिला राज

१३ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत
पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या 13 पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यात तब्बल सात पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती असणार आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. हे आरक्षण अडीच वर्ष कालावधीसाठी असणार आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी डॉ.चारुशीला देशमुख- मोहिते यांनी दिली.
या वेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहुल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. सोडतीच्या वेळी सन २००२ पासूनचे पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण कसे पडले व 2011 च्या लोकसंख्येचा विचार करून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.
सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे
* इंदापूर : अनुसूचित जाती
* जुन्नर : अनुसूचित जमाती महिला
* दौंड : नागरिकांचा मागासवर्ग
* पुरंदर : नागरिकांचा मागासवर्ग
* शिरूर : नागरिकांचा मागासवर्ग महिला
* मावळ : नागरिकांचा मागासवर्ग महिला
* वेल्हे : सर्वसाधारण महिला
* मुळशी : सर्वसाधारण महिला
* भोर : सर्वसाधारण महिला
* खेड : सर्वसाधारण महिला
* हवेली : सर्वसाधारण
* बारामती : सर्वसाधारण
* आंबेगाव : सर्वसाधारण





