पुणे – वैचारिक मतभेदामुळे १२ वर्षांपासून पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद समुपदेशनामध्ये मिटला आहे. काही महिन्यातच १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलीच्या भविष्याचा विचार दोघांनी हा निर्णय घेतला. एकामेकाविरोधात दाखल केलेले ६ दावे दोघांनी माघारी घेतले. विशेष म्हणजे दोघांचा घटस्फोट झाला असून, एकाच घरात राहत दोघांचे वाद सुरू होते. माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा पारंपारिक पध्दतीने पाहणी करून २००५ मध्ये विवाह झाला. २००७ मध्ये त्यांना मुलगी झाली. ती नोकरी करायची. तर तो पहिली ते बी.कॉम पर्यंतचे क्लास घ्यायचा. सगळे सुरूळीत असताना मुलगी ५ ते ६ वर्षाची असताना दोघात वैचारिक मतभेद निर्माण झाले. २०१३ मध्ये कोर्ट-कचेरी सुरू झाली. पत्नीने पती, सासु आणि सासऱ्याने रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात केली. तर पतीने पत्नी क्रुर वागणूक देत असल्याच्या कारणाने घटस्फोटासाठी अर्ज केला. मागील १२ वर्षात त्यांनी एकामेकाविरोधात तब्बल ६ दावे दाखल केले आहेत. पत्नीने केलेल्या पेटवून देण्याच्या अर्जातून तिघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज मंजुर झाला आहे. मात्र, तिने कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यात पतीच्या घरात राहण्याचा अधिकार कायद्याने मिळविला आहे. दोघात वाद सुरू होते. मात्र, अॅड. सुचित मुंदडा यांनी दोघांचे समुपदेशन केले. मुलगी लवकरच १८ वर्षे पूर्ण करणार आहे. दोघांनी वाद मिटवून तिच्या भविष्याचा विचार करा, असे समुपदेशनात सांगितले. दोघांना ते पटले. एकामेकाविरोधातील ६ खटले मागे घतेले