Pune News : बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरात वाहतुकीत होणार बदल
बकरी ईदनिमित्त लष्कर भागातील गोळीबार मैदान परिसरात उद्या ( गुरूवार दि.२८ मे) सामुहिक नमाजपठण होणार आहे. या पार्श्वभूमीवर (Pune News) सकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

Pune News : बकरी ईदनिमित्त लष्कर भागातील गोळीबार मैदान परिसरात उद्या ( गुरूवार दि.२८ मे) सामुहिक नमाजपठण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर (Pune News) सकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
बकरी ईदनिमित्त नमाजपठण करण्यासाटी गोळीबार मैदान परिसरात मुस्लीम बांधवांची गर्दी होती. या भागातील गर्दी विचारात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
लष्कर भागातील (Pune News) गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, सीडीओ चौक, सोलापूर बाजार चौकी परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबोनाला ते गोळीबार मैदान चौक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहन चालकांनी नेपियर रस्ता, बिशप स्कूल, कमांड हाॅस्पिटलमार्गे, लुल्लानगर चौकातून मार्केट यार्डकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शंकरशेठ रस्त्यावरुन गोळीबार मैदान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गुलटेकडी, सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौकातून नेपीयर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.






