pune news : कल्चरल ऑलिम्पीयाडमध्ये सृष्टी भोसले सुवर्णपदकाची मानकरी

Updated On:
pune news : कल्चरल ऑलिम्पीयाडमध्ये सृष्टी भोसले सुवर्णपदकाची मानकरी

पुणे – कल्चरल ऑलिम्पीयाड ऑफ परफॉर्निंग आर्टस् २०२४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिनीयर गटात सृष्टी अमोल भोसले हीने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची मानकरी ठरली. दि युनायटेड नॅशनल एज्युकेशनल, सायंटिफीक ॲण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन व अखिल भारतीय सांस्कृतीक संघ, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने युनायटेड अरब अमिराती येथील अबूधाबी येथे 14 व्या कल्चरल ऑलिम्पीयाडचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ कला क्षेत्रातील गुरू निवेदिता भट्टाचार्जी आणि गुरू बर्नालीजी यांच्या हस्ते पार पडला.

अखिल भारतीय सांस्कृतिक संघ २०१४ मध्ये प्रथम क्रमांक पटकावून युएई मध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी सृष्टी भोसले हीची निवड झाली होती. या स्पर्धेकरीता देश विदेशातून विविध स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. सृष्टी वयाच्या पाचव्या वर्षापासून शिल्पा भोमे यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे गिरवित आहे. ती आज विशारद प्रथम या कलाप्रकारात शिकत आहे.

ती एसएनडीटी, पिंपरी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिने आजपर्यंत भारतीय ९ वी राष्ट्रीय नृत्य स्पर्धा, नृत्यंगम् महोत्सव, अखिल भारतीय सांस्कृतिक संघ अशा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविले आहे. दुबईमध्ये सुवर्णपदक पटकावून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. तिची आता जागतिक स्पर्धेकरीता निवड झाली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

2026-10-08 22:25:36

Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

2026-10-08 19:09:16

Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट