पुणे – स्वारगेट वाहतूक विभाग हद्दीतील केशवराव जेधे चौक (अण्णाभाऊ साठे पुतळा) येथील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ पासून २२ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संबंधित रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. बंद रस्ता : केशवराव जेधे चौक स्वारगेट येथून सारसबागकडे जाणारा भुयारी मार्ग. पर्यायी मार्ग : जेधे चौक भुयारी मार्ग सुरू होण्याच्या ठिकाणी डावीकडील रस्त्याने जाऊन, पुन्हा जेधे चौकातून अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. ही अधिसूचना पोलीस उप आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी जाहीर केली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.