Pune News : ज्युडो आणि कराटे या खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रेम पवारचा “आदर्श खेळाडू पुरस्कारा’ने गौरव
Updated On:

कोंढवा : ज्युडो आणि कराटे या खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू प्रेम पवार यांना “आदर्श खेळाडू पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. वसंतदादा प्रतिष्ठानच्यावतीने कोंढवागावचे प्रसिद्ध पैलवान वस्ताद साहेबराव धांडेकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास कामगार नेते बजरंग वाघ, सुखदेव लोणकर, शिवाजी मरळ, नवनाथ धांडेकर, निलेश धांडेकर, श्रीकांत कारंडे, संतोष चोरमले, दत्तात्रय ठोसर, अर्जुन चौधरी, अशोक वाल्मीकी, गणेश शिंदे, मयूर कामठे, सुरज आलोटकर यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.





