Pune News : पुण्यात मनसेकडून जागतिक पर्यावरण दिन साजरा

पुणे : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे), पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रोड येथे ३१०० तुळशी आणि वनौषधी रोपांचे तसेच ‘पर्जन्यजल’ या पर्यावरणविषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या १६व्या वर्षी नागरिकांनी भर उन्हात शिस्तबद्ध रांगेत उभे राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस गणेश सातपुते, प्रवक्ते योगेश खैरे, माजी नगरसेविका सुशीला नेटके, उपाध्यक्ष आशिष देवधर, शहर सचिव राम बोरकर, रवि सहाणे, रमेश जाधव, विभागाध्यक्ष अजय कदम, सुनील कदम, विद्यार्थी सेनेचे महेश भोईबार, रुपेश घोलप, विक्रांत भिलारे, निलेश जोरी, अशोक पवार, तसेच महिला सेनेच्या जयश्री पाथरकर, सुरेखा होले, प्रतिक्षा रणधीर आदी उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपेश चांदेकर, संजय भोसले, करण मेहता, बबलू पारेख, ऋषिकेश करंदीकर, चंद्रकांत राजगुरु, वैभव मलभारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन मनसे पुणे शहर सचिव वसंत खुटवड आणि मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांनी केले. या उपक्रमाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत पुणेकरांमध्ये जनजागृती निर्माण केली.





