Pune News: पुणे स्थानिक गुन्हे शाखेचा मोठी कारवाई; दूध भेसळीच्या रॅकेटवर मोठा घाव
Pune News: १३ जणांना बेड्या; अडीच ते तीन कोटीचा मुद्देमाल जप्त, मंचर टोळीचे केंद्र, अकलूज, अहिल्यानगर, सिल्लोड, सांगलीत छापे

Pune News: पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा मार्गदर्शनाखाली मंचर, सिल्लोड, अकलूज, अहिल्यानगर, सांगली या परिसरात ही कारवाई करण्यात आली असून तब्बल तेरा जणांना अटक करण्यात आली आहे.
अडीच ते तीन कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील मंचर हे मुख्य केंद्र आहे. एक हजार लिटर दुधात ही टोळी पाचशे लिटर केमिकलच्या साह्याने तयार केलेले दूध मिक्स करत होती. त्यामध्ये शाम्पू, दूध पावडरचा देखील समावेश आहे.
पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाला रॅकेटची टीप मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर. इतर अधिकारी असे तीस जणांचे पथक तर अन्न औषध प्रशासनाचे वीस पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा:





