Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनी नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन
Gashmeer Mahajani :

Gashmeer Mahajani : अभिनेता गश्मीर महाजनीच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. याशिवाय तो सोशल मीडियाद्वारे देखील चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता गश्मीर लवकरच एका शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासोबत लोकप्रिय अभिनेत्री पाहायला मिळणार आहे
गश्मीर ‘१०८ बेस हॉस्पिटल उरी’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या शोची झलक पाहायला मिळाली आहे. गश्मीर यामध्ये डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. Gashmeer Mahajani
View this post on Instagram
त्याच्याबरोबर अभिनेत्री एरिका फर्नांडिस दिसणार आहे. त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे. एका फोटोत ते डॉक्टरच्या वेशात दिसत आहेत.
दरम्यान, एरिकाची ‘कुछ रंग प्यार के ऐसी भी’ मधील डॉक्टर सोनाक्षी बोस ही भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत तिने सुप्रिया पिळगांवकर यांच्याबरोबर काम केले होते. तसेच, कसौटी जिंदगी की या मालिकेतील प्रेरणा शर्मा ही भूमिकाही गाजली होती. याशिवाय तिने काही वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. Gashmeer Mahajani
हेही वाचा :
Ram Raksha Andolan : रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! भाजपचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार





