Pune News : खासगी व्यक्तीसह भू – करमापक ताब्यात; लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

पुणे – जमीन मोजणी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील भू करमापकाने तब्बल ४ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तडजोडी अंती भू – करमापका तर्पे ५० हजारांची लाच स्विकारताना खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
दौलत मधूकर गायकवाड (३५, भू – करमापक, हवेली कार्यालय) याच्यासह खासगी व्यक्ती योगेश्वर राजेंद्र मारणे (२५, रा. एरंडवणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनाही एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, तक्रारदार यांची देहूगाव येथे जमिन आहे. ती जमीन मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ते हवेली भुमी अभिलेख कार्यालयातील करमापक गायकवाड यांच्याकडे गेले होते.
त्यावेळी गायकवाड याने तक्रारदारांना ४ लाखांची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती.




