Pune News : ८८ वर्षांहून अधिक काळ आपली सुवर्ण परंपरा जपणाऱ्या आणि पुण्यातील (Pune News) प्रसिद्ध ज्वेलर्स म्हणून नावलौकिक मिळविलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सच्या वतीने सोन्याच्या पत्र्यापासून संत ज्ञानेश्वर माऊली यांची फोटो फ्रेम घडविण्यात आली आहे. केआरए ज्वेलर्सचे संचालक विपुल अष्टेकर यांच्या संकल्पनेमधून ही फ्रेम घडविण्यात आली. संत ज्ञानेश्वरांचे ७५० वी जयंती आणि गुढीपाडवा यांचे औचित्य साधत आळंदी (Pune News) येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीतर्फे चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा) यांच्या हस्ते या फ्रेमचे औपचारिक अनावरण आज आळंदी येथे करण्यात आले. समितीचे व्यवस्थापक वीर माऊली हे देखील यावेळी उपस्थित होते. Pune News या फ्रेमविषयी अधिक माहिती देताना विपुल अष्टेकर म्हणाले, “संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेसारखी आणि सोन्याचा वापर करीत घडविण्यात आलेली कोणतीच फोटो फ्रेम आज बाजारात उपलब्ध नाही हे लक्षात आल्या नंतर केआरए ज्वेलर्सने ही फ्रेम घडविण्याचा निर्धार केला. सदर फ्रेममध्ये ९९.९% शुद्ध सोन्याच्या पत्र्याचा वापर करीत माऊलींची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली आहे. साधारण २२ इंच रुंदी तर २६ इंच उंची असलेली ही फ्रेम — संत ज्ञानेश्वर माऊलींची फ्रेम स्वरूपात असलेले भारतातील सर्वात मोठ्या फ्रेम पैकी एक फ्रेम आहे हे विशेष.” आज मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या फ्रेमचे अनावरण आळंदी देवस्थान (Pune News) येथे संपन्न झाले असून केआरए शोरूममध्ये विविध आकारांत सदर फ्रेम ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध आहेत, असेही अष्टेकर म्हणाले.