१० वर्षांत १० दालनांचा विस्तार; लवकरच करणार महाराष्ट्रात आणखी विस्तार
पुणे : तब्बल ४०० वर्षांच्या परंपरेसोबतच नाविन्यता आणि विश्वास यांच्या जोरावर ग्राहकांच्या मनात आणि सराफ विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ‘कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स’ अर्थात ‘केआरए ज्वेलर्स’ आता दक्षिण पुण्यातील नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. शहरातील सातारा रस्ता येथील वाळवेकर लॉन्स’जवळ केआरए ज्वेलर्स’ची दहावी शाखा नुकतीच सुरु झाली आहे. ग्राहकांना याठिकाणी सोने-चांदी आणि हिऱ्यांच्या दागिने खरेदीचा एक परिपूर्ण अनुभव घेता येणार आहे.
केआरए’चे हे नवीन दालन तब्बल ३००० स्केअर फूट जागेवर उभारण्यात आले असून, याठिकाणी सोने, चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र विभाग आहेत. अगदी हलक्या वजनाच्या दागिन्यांपासून लग्न, सण-समारंभ यांसाठी भरगच्च दागिने याठिकाणी उपलब्ध आहेत. पारंपारिक दागिन्यांसोबतच ‘टेम्पल ज्वेलरी’ आणि खास वर्किंग वूमन्स’साठी, रोज वापरता येईल अशी ‘9 टू 5 डायमंड ज्वेलरी’ परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर १८ आणि २२ कॅरट वजनाची सोने आणि मौल्यवान रत्नांनी बनविलेल्या दागिन्यांचा समावेश असलेल्या ‘न्यासा फॅशन ज्वेलरी’साठी देखील एक स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते खास तरुणांसाठी तयार करण्यात आले आहे. यलो गोल्ड, रोज गोल्ड आणि व्हाइट गोल्ड प्रकारातील दागिन्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
व्यवहारातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता हे केआरए’चे बलस्थान असून, आपल्या विश्वासार्हता आणि आपलेपणा यांच्या जोरावर ग्राहकांच्या तीन ते चार पिढ्या केआरए ज्वेलर्स’शी जोडल्या गेल्या आहेत. ‘केआरए’च्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती देताना संचालक अतुल अष्टेकर म्हणाले, “ कृष्णा राजाराम अष्टेकर सराफ पेढीची सुरुवात माझे आजोबा राजाराम अष्टेकर यांनी १९३७ साली सोन्या मारुती चौक येथे केली. आमचे मूळ गाव मराठवाड्यामधील जालना जिल्ह्यातील अष्टी हे आहे. त्याठिकाणी ब्रिटीशांच्या काळात आमच्या आधीची पिढी ही जवळपासच्या गावांच्या आठवडी बाजारात जाऊन या मौल्यवान दागिन्यांची विक्री करत असत. परंतु ब्रिटिशांनी गावकऱ्यांवर नीळ उत्पादन करण्याची सक्ती केली. त्यामुळे तेथील स्थानिक व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळेच आमचे पणजोबा वामनराव व भाऊसाहेब अष्टेकर यांनी पुण्यात १९२२ च्या सुमारास व्यवसायाची सुरुवात केली.
आजोबा राजाराम अष्टेकर यांनी आपले काका भाऊसाहेब व वामनराव अष्टेकर यांच्याबरोबर काही काळ काम केले व नंतर मुलगा कृष्णा यांच्या नावाने ‘केआरए’ची स्थापना केली. त्यावेळी पेढीतून आधुनिक शोरूमच्या स्वरुपात आलेली ही पहिली पेढी होती. आपल्या ग्राहकांशी व्यवहारापलीकडे जावून, जवळचे नाते जोडले आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यातूनच केआरए हे पुढे पिढ्यानपिढ्यांचे ‘फॅमिली सराफ’ बनले. आजोबांची ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. केवळ ग्राहकच नव्हे, तर कर्मचारी, कारागीर यांच्या तीन पिढ्यांशी घरच्यासारखे नाते तयार झाले आहे.
राजाराम अष्टेकर यांच्यानंतर व्यवहाराची धुरा त्यांचे पुत्र कृष्णा अष्टेकर यांच्या हाती आली. त्यांनीदेखील अतिशय सचोटीने ही जबाबदारी पार पाडली. पुढे त्यांनी व्यवसायाची जबाबदारी मुले अमोल, अतुल आणि विपुल अष्टेकर यांच्या हाती सोपविली. निवृत्तीनंतर कृष्णा अष्टेकर यांनी गोसंवर्धन कार्य हाती घेत, अष्टी या आपल्या मूळ गावी २०० गीर गायींचा समावेश असलेली गोशाळा सुरु केली. त्यांच्या मुलांनी सुवर्ण व्यवसायाचा आपला वारसा केवळ जपला नाही, तर तो वृद्धींगत केला. परिणामी २०१२ ते २०२२ या दहा वर्षांच्या कालावधीत केआरए’ने आपल्या दहा शाखांचा विस्तार केला.
या शाखा विस्ताराबाबत अतुल अष्टेकर म्हणाले, “ केआरए’ने आपली तिसरी शाखा २०१२ साली पुणे शहराबाहेर चिंचवड येथे सुरु केली. पिंपरी- चिंचवड परिसरातील ग्राहकांना चांगली सुविधा देण्याच्या उद्देशाने ही शाखा सुरु करण्यात आली होती. आणि त्याला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर पुणे शहराचा हळू हळू विस्तार होत गेला, त्याप्रमाणे केआरए’ने देखील उपनगरांमध्ये आपल्या शाखांचा विस्तार केला. यामध्ये हडपसर, विमानगर, औंध, पौड रस्ता यांचा समावेश आहे.
दक्षिण पुण्याची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेत, या परिसरातील नागरिकांना सोन्या-चांदीचे आणि हिऱ्यांचे दागिने, वस्तू खरेदीसाठी परिसरात एका चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे नवीन दालन सुरु करण्यात आले आहे. यामुळे शहराच्या दक्षिण भागातून मध्यवस्तीत येण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे, तसेच पार्किंग आणि अन्य प्रश्नांचा सामना करावा लागणार नाही आणि नागरीक निश्चिंतपणे खरेदीचा आनंद घेऊ शकतील. तसेच पुणे शहराबाहेर बारामती आणि सातारा जिल्ह्यातही आपला शाखा विस्तार केला आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्रात अन्य ठिकाणीदेखील शाखा विस्तार प्रस्तावित आहे.’’
शुद्ध दागिन्यांसाठीचे सराफ अशी केआरए’चे ओळख आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क असने बंधनकारक आहे, तसेच केआर ज्वेलर्स येथे दागिने घडवताना त्यांची शुद्धतेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि ग्राहकांना दागिन्यांच्या देखभालीची जास्त काळजी घ्यावी लागणार नाही, याची दक्षता घेतली जाते. ग्राहकांसमोर कॅरेटोमीटरवर मोजणी करण्याची पद्धत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांनीच सुरु केली. दागिन्यांच्या घडणावळीवर तुलनेने कमी शुल्क हे केआरए’चे वैशिष्ट्य असून, केआरए ज्वेलर्स ग्राहकांना पारदर्शक आणि दर्जेदार व्यवहाराची हमी देते.’’