Pune Accident News : कात्रज डेअरी चौकात भीषण अपघात; डंपरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
Pune Accident News : पुण्यातील कात्रज डेअरी चौकात हायवा डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pune Accident News : पुण्यातील कात्रज डेअरी चौक परिसरात एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुपिटर मोटार मोपेड (क्र. GJ 01 PZ 1374) वरून जात असताना संबंधित महिलेला एमएच १२ वाय क्यू ७२५९ क्रमांकाच्या हायवा डंपरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीवरील महिला डंपरच्या पाठीमागील टायरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव प्ररिमा प्रधान (वय-३८) असून त्या कात्रज कोंढवा रोड येथील श्रीज्वेल सोसायटीमध्ये वास्तव्यास होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हायवा डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.





