Pune News : एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
देशभक्तीच्या जयघोषात एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन (Pune News) उत्साहात साजरा करण्यात आला.

Pune News : देशभक्तीच्या जयघोषात एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात भारताचा ८०वा स्वातंत्र्य दिन (Pune News) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव ए. अजय कुमार आणि मेजर जनरल डॉ. ताजुद्दीन म्हैसले, व्हीएसएम (निवृत्त) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी ए. अजय कुमार यांनी विद्यार्थ्यांना यशाच्या मागे न धावता (Pune News) ज्ञान मिळविण्यावर भर देण्याचे आवाहन केले. “ज्ञानाचा वापर देशाच्या विकासासाठी करा, यश आपोआप पाठोपाठ येईल,” असे ते म्हणाले.
मेजर जनरल डॉ. म्हैसले यांनी भारताच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, कृत्रिम बुद्धिमत्ता ही समस्या नसून नवोन्मेषाची संधी असल्याचे नमूद केले. तर प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी युवकांनी तंत्रज्ञान, एआय आणि नवोन्मेष आत्मसात करून भारताच्या विकासाला गती द्यावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमात मॅनेट कॅडेट्सची बँडसह शिस्तबद्ध परेड, एनसीसी कॅडेट्सची मानवंदना, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक (Pune News) कार्यक्रम आणि देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.






