Pune News: सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे हवेली करांनी मानले आभार; पुलाला दिली ३२ कोटी रुपयांची मंजुरी
Updated On:

वाघोली – कोरेगाव मूळ-आष्टापुर-बिवरी-वाडेबोल्हाई या गावांना जोडणारा मुळा-मुठा नदीच्या पुलाला मंजुरी रक्कम ३२ कोटी रुपये दिल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सदिच्छा भेट घेतली व पुलाला मंजुरी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
हवेली मधील अनेक गावांना जोडणारा एकमेव पूल म्हणून याची ओळख निर्माण होणार आहे. पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी आंदोलने व वेळोवेळी मंत्री स्तरावर निवेदन दिली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश आल्याने ग्रामस्थ समाधानी झाले होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा निधी दिल्याबद्दल शूर हवेली मधील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राहुल कुल, दिलीप मोहीते पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, प्रकाश जगताप उपस्थित होते.





