Pune news : मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, केळी, पान विभाग गुरूवारी बंद !
Updated On:

पुणे – येत्या गुरूवारी (दि.२३) भाऊबीज आहे. भाऊबीजेच्या दिवशी दरवर्षी बाजार बंद असतो. त्यानुसार मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळे, भाजीपाला विभाग, पान विभाग, केळी बाजार, तसेच मोशी उपबाजार बंद राहणार आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी फुल बाजार बंद असतो.
त्यानुसार यंदा शुक्रवारी (दि.२४) फुल बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, तसेच खरेदीदारांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले





