Pune News : अग्निशमन दलाने वाचवला अतिरिक्त आयुक्तांचा जीव; 15 मिनिटांत मिळवले आगीवर नियंत्रण
महापालिकेच्या (Pune News) आपत्ती व्यवस्थापन विभागाने दुपारी ३.५५ वाजता मुख्य इमारतीत बॉम्बस्फोटसदृश आवाज होऊन आग लागल्याची परिस्थिती निर्माण केली. याबाबत अग्निशमन दल नियंत्रण कक्ष, शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि १०८ रुग्णवाहिका सेवेला माहिती देण्यात आली.

Pune News : महापालिकेच्या मुख्य इमारतीत स्फोट होऊन आग लागली… अधिकारी आणि कर्मचारी इमारतीत अडकले… तर अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर यांच्यासह काही जणांनी सुरक्षिततेसाठी गच्चीवर धाव घेतली. अशा आपत्कालीन परिस्थितीत (Pune News) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
उंच शिडीच्या साह्याने नायर यांच्यासह गच्चीवर अडकलेल्या अधिकारी आणि नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. जागतिक आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त मंगळवारी (दि. १३) महापालिकेच्या मुख्य इमारतीत आयोजित केलेल्या मॉक ड्रिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता तपासण्यात आली.
महापालिकेच्या (Pune News) आपत्ती व्यवस्थापन विभागाने दुपारी ३.५५ वाजता मुख्य इमारतीत बॉम्बस्फोटसदृश आवाज होऊन आग लागल्याची परिस्थिती निर्माण केली. याबाबत अग्निशमन दल नियंत्रण कक्ष, शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि १०८ रुग्णवाहिका सेवेला माहिती देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कसबा आणि एरंडवणा अग्निशमन केंद्रांतील वाहने तातडीने रवाना झाली. त्यानंतर अग्निशमन मुख्यालयातील उंच शिडीचे वाहन, रेस्क्यू व्हॅन तसेच नायडू आणि जनता वसाहत येथील अग्निशमन वाहनेही घटनास्थळी दाखल झाली.
दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर जवानांनी आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. या वेळी चार कर्मचारी अडकले होते. त्यांना फायरमन लिफ्टच्या साह्याने खाली आणून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले.
गच्चीवर गेलेले अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांच्यासह इतर अधिकारी आणि नागरिकांची उंच शिडीच्या मदतीने सुटका करण्यात आली. अन्य पाच जखमींनाही बाहेर काढण्यात आले. सुरक्षा विभागाने संपूर्ण इमारत रिकामी केली.
अग्निशमन दलाने (Pune News) विविध प्रकारच्या अत्याधुनिक नोझल आणि होज पाइपचा वापर करून अवघ्या १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांचे बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि स्थानिक पोलिसांनी संपूर्ण इमारतीची तपासणी केली.
मॉक ड्रिलनंतर अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी अग्निशमन अधिकारी आणि जवानांसह सहभागी विभागांचे कौतुक केले. अशा सरावातून आपत्कालीन परिस्थितीतील अडचणी आणि त्रुटी लक्षात येतात. त्यानुसार आवश्यक उपाययोजना करणे शक्य होते, असे त्यांनी नमूद केले. मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांनी अग्निशमन दल, पोलीस, बॉम्बशोधक पथक, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि विद्युत विभागाच्या समन्वयाचे कौतुक केले.






