Pune News : फ्रेशर पार्टीच्या नावाखाली बेधडक धिंगाणा; आयोजकांना पोलीस आयुक्तांचा कडक इशारा!
पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टीच्या नावाखाली पबमध्ये बेधडक धिंगाणा घालणाऱ्यांना यापुढे पोलिसांची कडक झटका बसणार आहे. “अल्पवयीनांना मद्यविक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करून थेट गुन्हा दाखल केला जाईल,” असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. मुंढव्यातील पिंगळेवस्ती परिसरातील पबमध्ये झालेल्या परवानगीविना पार्टीत रस्त्यावर बाटल्या फोडल्याच्या प्रकारानंतरच पोलिसांनी हा निर्णय घेतला.
याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात राजा बहाद्दुर मिल परिसरातील हॉटेल किकी येथे १०० ते १५० महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी झालेल्या पार्टीदरम्यान अल्पवयीनांना मद्य पुरवल्याचा आरोप झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा उचलल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “बार, पबमध्ये नियम मोडणाऱ्यांवर आता कुठलीही दया दाखवली जाणार नाही. महाविद्यालयांना देखील याबाबत सूचना देण्यात येणार असून, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल.





