Pune News : कल्याणी नगरमध्ये पाकिस्तानी गायकावरून वाद; कार्यकर्त्यांना बाउन्सरकडून धक्काबुक्की
Updated On:

पुणे : कल्याणी नगर येथील Ballr या क्लबमध्ये पाकिस्तानी गायकाला बोलावल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने करत जोरदार आंदोलन केले. यावेळी क्लबमध्ये इंडिया–पाकिस्तान क्रिकेट सामना दाखविण्याचे आयोजनही करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी याला तीव्र विरोध दर्शविला.
आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी क्लबमधील बाउन्सर यांनी कार्यकर्त्यांना अडविताना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पुढील कारवाईसाठी संबंधित क्लब व आयोजकांची चौकशी सुरू आहे.





