वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील रस्ते ,पानी ,ड्रेनेज , ट्रॅफिक तसेच इतर अनेक स्थानिक समस्या सोडविण्यासाठी शिरूर हवेलीचे आमदार माउली कटके यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. लवकरच महानगर पालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी तसेच पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी ),विद्युत विभाग या सर्वांची एकत्रित मिटिंग घेऊन वाघोली मधील विविध कामे लवकर मार्गी लावण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले. आयुक्तांनी यावर लवकरच सर्वांची एकत्रित मिटिंग घेऊन वाघोलीच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पंचायत समितीचे माजी सदस्य सर्जेराव वाघमारे, वाघोली चे माजी उपसरपंच समीर भाडळे, माजी उपसरपंच संदीप सातव, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र सातव पाटील,अनिल सातव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.